100 percent subsidy for fertilizer: भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत बी बियाणे, ठिबक सिंचन आदी कामांवर 100 टक्के अनुदान दिले जात होते. मात्र आता त्यात खतांचाही समावेश करण्यात आला आहे. या योजनेत खतासाठी देखील 100 टक्के अनुदान देण्याची घोषणा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांना दिलासा
सध्या बाजारात खतांचे भाव गगनाला भिडले आहेत. फलोत्पादनात खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत विविध कामांसाठी आतापर्यंत 100 टक्के अनुदान उपलब्ध होते. मात्र यामध्ये खतांचा समावेश करण्यात आला नव्हता.100 percent subsidy for fertilizer
त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला होता. मात्र आता खतांवर 100 टक्के अनुदान जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
बाग लागवडीखालील ठिबक सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान दिले जाते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबकऐवजी सर्व प्रकारच्या जीवनावश्यक खतांसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री महोदयांनी केली आहे. तसेच गरज पडल्यास 100 कोटी रुपयांची तरतूद आणखी वाढवणार असल्याची माहितीही मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.100 percent subsidy for fertilizer
या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा