Bank loan: पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या बँकेकडून मिळणार कर्ज, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

Bank loan: ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे:-

जर पालक आपल्या पाल्याला पहिली ते बारावीत प्रवेश मिळवून देत असतील तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असेल, यासाठी पालकांची केवायसी कागदपत्रे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेशाचा पुरावा, विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, शैक्षणिक खर्चाचा तपशील आवश्यक असू शकतो. पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा 6 महिन्यांचे बँक खाते विवरणपत्र किंवा मालमत्तेचे दस्तऐवज आवश्यक असल्यास प्रदान करावे.

किती रुपयांचे कर्ज मिळेल?

बँक ऑफ बडोदा बँकेच्या ‘बडोदा विद्या’ या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे कर्ज मिळेल.
हे विद्यार्थी कर्ज तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार दिले जाईल. या कर्जामध्ये कॉलेज फी, लायब्ररी फी, वसतिगृह निवास, मुलांसाठी पुस्तके किंवा इतर साहित्य, संगणक/लॅपटॉप आणि इतर विषयांचा समावेश असेल. तुम्हाला बारा महिन्यांनंतर कर्जाची परतफेड करावी लागेल. पहिला हप्ता कर्ज वाटप झाल्यानंतर बारा महिन्यांनी सुरू होतो.Bank loan