Breking News: राज्यात झालेल्या पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे हाल झाले आहेत. पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. या घोषणा खालील प्रमाणे दिलेले आहेत.
- राज्यातील पूरपरिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात पहिल्या घोषणा पूरग्रस्तांना 10,000 रुपयांची तात्काळ मदत सरकारकडून देण्यात येणार आहे.
- दुसऱ्या गोष्टींमध्ये ज्या नागरिकांच्या दुकानाचे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना 50 हजाराची मदत दिली जाणार आहे.
- तिसरी घोषणा म्हणजेच जे नागरिक पुरात किंवा वीज कोसळून मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना 4 लाखाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
याशिवाय शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ मूल्यांकन करणे, नुकसानग्रस्तांना तातडीने धान्य पुरवठा करण्याचे असे आदेशही देण्यात आले आहेत. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, जे रस्ते खराब झाले आहेत ते तातडीने दुरुस्त करावेत, ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना नवीन शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे. अशा इत्यादी घोषणा अजित पवार यांनी केलेले आहेत.Breking News