Business idea: खाली दिलेल्या तीन व्यवसाय करून महिला घरबसल्या लाखो रुपये सहज कमवू शकतात….
(1) फूड व्लॉगिंग: फूड व्लॉगिंगने आज अनेक महिलांचे जीवन बदलले आहे. आजकाल लोक स्वयंपाकाचे म्हणजेच रेसिपीचे व्हिडिओ खूप पाहतात. आणि स्त्रिया असे व्हिडिओ खूप पाहतात. हे लक्षात घेऊन तुम्ही यूट्यूबवर चॅनल तयार करून डॉलर्समध्ये कमाई करू शकता. आज लोक अशा मध्यमातून लाखोंची कमाई करत आहेत.
(२) लोणचे : आपल्या देशातील लोकांना लोणचे मोठ्या प्रमाणात खायला आवडते. लोणचे हे कोणत्याही ऋतूत खूप आवडीने खाल्ले जाते. त्यामुळे लोणच्याला नेहमीच मागणी असते. त्यामुळे लोणची बनवणे हा महिलांसाठी चांगला व्यवसाय आहे. सगळ्यात आधी तुमच्या जवळच्या बाजारात जाऊन तिथल्या लोणच्याचा नमुना किराणा दुकानदाराला द्यायचा आहे. दुकानदारांना तुमचे लोणचे आवडल्यानंतर तुम्हाला ते पॅक करून दुकानदारांना विकायचे आहे. अशा प्रकारे तुमच्या ऑर्डर्स दिवसेंदिवस वाढत जातील आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. त्यानंतर तुम्ही वेबसाइटद्वारे तुमचे लोणचे ऑनलाइन विकू शकता.
(३) टिफिन सेवा: घरगुती व्यवसाय मध्ये महिलांसाठी टिफिन सेवा हा एक चांगला व्यवसाय आहे. लोक अभ्यासासाठी तसेच नोकरीसाठी गावापासून दूर राहतात. अनेकांना बाहेरचे जेवण खावे लागते. तुमच्या गावात किंवा शहरात मोठ्या प्रमाणात कामगार आणि चांगल्या शैक्षणिक सुविधा असल्यास तुम्ही टिफिन सेवा व्यवसाय करू शकता आणि चांगली कमाई करू शकता.Business idea