Cotton spray: शेतकरी मित्रांनो, कापसाच्या पिकाला जवळपास एक महिना होऊन गेला. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे कापूस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूस पिकावर दुसऱ्या फवारणीची आवश्यकता आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये कोणते कीटकनाशक करावे त्यामुळे किडींचे नियंत्रण होईल. याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
कापूस पिकावर फवारण्यासाठी लागणाऱ्या कीटकनाशकाचा पहा व्हिडिओ
शेतकऱ्यांना, जास्तीत-जास्त उत्पादन घेण्यासाठी कपाशीची नियमित फवारणी करणे आवश्यक आहे. कापूस पिकावर दुसरी फवारणी करताना, पिकाची एकूण गुणवत्ता वाढविण्यासाठी कीटकनाशकासह विद्राव्य खत किंवा टॉनिक वापरण्याची शिफारस केली जाते.
कापूस पिकावर दुसरी फवारणी करताना या प्रकारे काळजी घ्या…
फवारणी करताना औषधाचे प्रमाण योग्य असावे. कंपनीने दिलेले औषध वापरावे आणि फवारणी करताना एकाच वेळी जास्त औषधाची फवारणी करू नये. पावसाचे पाणी आणि जास्त काळ साठलेले पाणी फवारणीसाठी वापरणे टाळावे. आज दुपारी पाऊस पडत आहे, त्यामुळे फवारणी करताना स्टिकर्स वापरा. औषधाची निवड करताना कृषी सेवा केंद्र चालकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
फवारणी करताना औषधाची मात्रा कमी किंवा जास्त असल्यास फवारणी केलेल्या पिकाचे नुकसान होऊ शकते. फवारणी प्रक्रियेदरम्यान एकाच वेळी जास्त प्रमाणात औषध फवारले तर ते पिकांना हानी पोहोचवू शकते. पावसाचे पाणी आणि जास्त काळ साठलेले पाणी फवारणीसाठी वापरले तर त्या कीटकनाशकाचा 100% निकाल मिळत नाही.
कापूस पिकावर फवारण्यासाठी लागणाऱ्या कीटकनाशकाचा पहा व्हिडिओ
आज दुपारी पाऊस पडत आहे, त्यामुळे फवारणी करताना स्टिकर्स वापरा. स्टिकर लावल्याने औषध पाण्याबरोबर वाहत नाही आणि पिकांपर्यंत पोहोचणार नाही. औषधाची निवड करताना कृषी सेवा केंद्र चालकाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. कृषी सेवा केंद्र चालक तुम्हाला तुमच्या पिकासाठी योग्य औषध निवडण्यात मदत करू शकतात. फवारणी करताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवा.Cotton spray