Cricket Live News: जे विराट-रोहितलाही जमले नाही ते सूर्याने केले! अशी कामगिरी करणारा जगातील फक्त दुसरा खेळाडू…

Cricket Live News: सूर्यकुमारने कोणता विक्रम केला आहे?

सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100 षटकार पूर्ण केले आहेत. षटकारांचे शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जागतिक स्तरावर अशी कामगिरी करणारा तो 13वा खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमारच्या आधी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितच्या नावावर 182 षटकार आहेत.

विराटच्या नावावर 117 षटकार आहेत. मात्र या दोघांपेक्षा सूर्यकुमार यादव या यादीत सरस आहेत. कारण सूर्यकुमारने कमी चेंडूंमध्ये हा विक्रम केला आहे. म्हणजेच सर्वाधिक वेगाने 100 षटकारांचा आकडा पार करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार पहिल्या स्थानावर आहे.