Ek shetkari ek dp yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. त्याचबरोबर मित्रांनो एक शेतकरी एक डीपी योजना ही देखील अशीच शेतकऱ्यांना लाभ देणारी योजना आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आता पुन्हा एकदा ही योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जातात. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर मिळतो. माहितीनुसार, आपल्या शेतकरी बांधवांना नियमित आणि अखंड वीज मिळावी यासाठी ही योजना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान आता या योजनेचे स्वरूप आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहणार आहोत
एक शेतकरी एक डीपी योजनेचे स्वरूप
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना आपला हिस्सा द्यावा लागणार आहे. या योजनेंतर्गत डीपी मिळविण्यासाठी सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये द्यावे लागतील. यासोबतच, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 5000 रुपये प्रति हॉर्स पॉवर म्हणजेच प्रति एचपी खर्च करावे लागतील.Ek shetkari ek dp yojana
शेतकऱ्यांनी ही रक्कम भरल्यानंतर स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची अतिरिक्त किंमत राज्य सरकारमार्फत दिली जाते. या योजनेच्या संदर्भात, महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत सामान्य श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी प्रति एचपी 7000 रुपये आणि एससी एसटी श्रेणीतील शेतकऱ्यांना 5000 रुपये खर्च करावे लागतील.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर या योजनेअंतर्गत 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला प्रति एचपी 11000 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. यानंतर डीपी उभारणीसाठी लागणारा खर्च महावितरणला राज्य सरकारमार्फत संबंधित शेतकऱ्यांना अनुदान म्हणून मंजूर करून दिला जातो. म्हणजेच उर्वरित खर्च राज्य सरकार उचलते.
जर SC/ST शेतकऱ्याकडे दोन हेक्टर जमीन असेल आणि त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला प्रति एचपी 5000 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच तीन हॉर्सपॉवर म्हणजेच तीन एचपी क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवायचा असेल तर त्याला एकूण 15 हजार रुपये खर्च करावे लागतील.
तसेच सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास त्याला प्रति हॉर्स पॉवर 7 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे जर त्याने तीन एचपीचा डीपी घेतला तर त्याला 21 हजार रुपये द्यावे लागतील आणि उर्वरित रक्कम सरकार देईल.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु जर एखाद्या शेतकऱ्याकडे पाच हेक्टरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्याला प्रति एचपी 11,000 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच अशा शेतकऱ्यांनी तीन हॉर्स पॉवरचा डीपी घेतल्यास 33 हजार रुपये खर्च होतात.Ek shetkari ek dp yojana