Eyes Flu Solution: मित्रांनो, आय फ्ल्यू होऊ नये म्हणून तुम्ही सतत स्वच्छ पाण्याने डोळे धूत जा. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला आय फ्ल्यू झाला आहे त्या व्यक्ती पासून सुरक्षित अंतर ठेवावे. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये बघू नये. त्याचबरोबर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला आय फ्ल्यूची खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ दवाखान्यात घेऊन जावे.
डोळ्याच्या फ्लूची लक्षणे
- लाल डोळे
- डोळ्यांवर सूज येणे
- डोळ्यांना खाज सुटते
- डोळ्यांची जळजळ
- प्रकाशाची संवेदनशीलता
- डोळ्यांमधून पांढरा चिकट स्त्राव होणे
- डोळ्यातून सतत पाणी येणे
डोळे आल्यास ही काळजी घ्या
- स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा
- जोपर्यंत डोळ्यांचा संसर्ग आहे तोपर्यंत कुटुंबापासून सुरक्षित अंतर ठेवा.
- डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमाल वापरावा.
- उन्हात गडद काळ्या रंगाचा सनग्लासेस वापरा Eyes Flu Solution