Gharatil Palipasun Sutka: घरात भरपूर पाली झाल्या असतील तर करा हा उपाय, घरात एकही पाल राहणार नाही

Gharatil Palipasun Sutka: घरातील पाली पासून सुटका मिळवण्यासाठी खालील उपाय करून नक्की पहा….

लसूण

लसूण सोलून घरात, बाथरूममध्ये, म्हणजेच तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला पाल दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही लसूण ठेवा. कारण लसणाचा वास पालीसाठी खूपच घातक असतो यामुळे पाल घराबाहेर निघून जाईल.

कांदा

कांदा खाने हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे त्याचे अनेक फायदे आहेत. कांद्याच्या मदतीने तुम्ही पालीपासून मुक्त होऊ शकता. यासाठी कांद्याचे तुकडे करून घराच्या कोपऱ्यात आणि ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी ठेवा. कांद्याचा वास पालला काही वेळात घरापासून दूर नेईल.

मोराचे पंख

जर तुम्हाला पालीला घरातून हाकलायचे असेल तर घरात मोराचे पिसे ठेवा. त्यासाठी घराच्या भिंतीवर मोराचे पंख सेलोटेपने चिकटवा. यासोबतच तुम्हाला ज्या ठिकाणी पाल सतत दिसत आहे अशा ठिकाणी मोराचे पंख ठेवा.

अंड्याचे कवच

अंडी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते त्याचबरोबर हे अंडे घरातील पाल बाहेर हाकलून देण्यासाठी देखील मदत करतात. अंड्याच्या टरफलेच्या मदतीने तुम्ही पालीला घरात प्रवेश करण्यापासून रोखू शकता. ज्या ठिकाणी सर्वाधिक पाली आहेत अशा ठिकाणी तुम्ही अंड्याची टरफले ठेवल्यास त्या पाली तुमच्या घरात येणार नाहीत.Gharatil Palipasun Sutka