Krushi Vibhag Bharti : रामेस बैस यांनी राज्यातील आदिवासी क्षेत्रातील (PESA) विविध 17 संवर्गातील थेट सेवेची पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. राज्यपालांच्या या आदेशात कृषी सहाय्यक संवर्गातील पदांचा समावेश आहे. त्यामुळे ठाणे,पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीतील पेसा क्षेत्रातील पदांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.