Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होणार, राज्यातील या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा..!!

Maharashtra Rain Alert: कोकणात मुसळधार पाऊस, विदर्भातही मोठा पाऊस पडणार

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. IMD ने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 204.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे काही भागात पूर येऊ शकतो. त्याचबरोबर हवामान खात्यानेही नागरिकांना पाणी साचलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे आणि संवेदनशील ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.