Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Onion Subsidy Yojana: शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान कधी मिळणार? लगेच पहा संपूर्ण माहिती

Onion Subsidy Yojana: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे भाव घसरल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केले आहे. एप्रिल महिन्यात कांदा अनुदानाचे अर्ज भरून दोन महिने उलटले, तरी शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान कधी मिळणार, याचा काहीच पत्ता नाही. कांदा अनुदानाची ही घोषणा सरकारच्या इतर घोषणांसारखी फसवी तर नाही ना? अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

 

 

 

कांदा अनुदान कधी मिळणार येथे पहा संपूर्ण माहिती

 

सरकार केवळ कागदपत्र पडताळणीसाठी एवढा उशीर करत आहे. कांदा अनुदानाचे हे पैसे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना मिळतील, अशी अपेक्षा होती, मात्र खरीप पेरणी पूर्ण होऊनही कांदा अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अशा स्थितीत या सरकारच्या घोषणांवर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.Onion Subsidy Yojana

यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. कांद्याच्या पैशातून वाहनाचे भाडेही शेतकऱ्यांना देता आले नाही. अशा सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या सरकारने कांदा अनुदान देण्याचे जाहीर केले होते.

 

 

कांदा अनुदान कधी मिळणार येथे पहा संपूर्ण माहिती

 

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र कांदा अनुदानासाठी अर्ज भरून दोन महिने उलटले असताना, अनुदान कधी मिळणार, याबाबत सरकारकडून कोणतीही पुढील प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार की नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ,

सरकारने कांद्याचे अनुदान जाहीर केले, तेव्हाच या अनुदानासाठी काही जाचक अटी घालण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नंतर काही कारणे सांगून अनेक शेतकऱ्यांना या अनुदानातून वगळण्यात आले आणि उर्वरित पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळणार याबाबत राज्य सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.Onion Subsidy Yojana

 

 

कांदा अनुदान कधी मिळणार येथे पहा संपूर्ण माहिती

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now