Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Saur krushi Pump: सौर कृषी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे..! शेतकऱ्यांना मिळत आहे अवघ्या 12 हजार रुपयात सौरपंप, असा करा ऑनलाईन अर्ज

Saur krushi Pump: विजेअभावी शेतातील पिकांना पाणी मिळत नाही. या कारणामुळे हजारो शेतकऱ्यांची पिके सुकत असल्याचे वास्तव आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी योजना लागू केली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून सौर कृषी पंप बसविण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 340 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, त्यासाठी महावितरणने 1700 एकर शासकीय जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

 

 

 

अवघ्या 12 हजार रुपयात सौरपंप खरेदी करण्यासाठी येथे करा अर्ज

 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 140 वीज उपकेंद्रांच्या परिसरात खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 2025 पर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्य सरकारने उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे.

विशेष म्हणजे 24 तास अखंड वीजपुरवठा होणार असून शेतकऱ्याला वीज बिलाची चिंता करावी लागणार नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कृषी पंपांना दिवसा वीज देण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे.Saur krushi Pump

 

 

अवघ्या 12 हजार रुपयात सौरपंप खरेदी करण्यासाठी येथे करा अर्ज

 

वीज उपकेंद्रापासून 5 कि.मी. प्रदेशात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. कृषी पंपांसाठी दररोज 450 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना वीज लोडशेडिंगपासून दिलासा मिळेल आणि त्यांना दिवसा वीज मिळण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना जमिनीचे भाडे मिळणार :-

सरकारी जमिनीसाठी 1 रुपये प्रति एकर नाममात्र भाडे आकारले जाईल, तर खासगी जमिनीवर प्रकल्प उभारल्यास वार्षिक 50,000 रुपये प्रति एकर भाडे द्यावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 51 हजार कृषी पंपांना वीज जोडण्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा कृषी उत्पादनाला होणार असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

दोन वर्षांत 1 लाख कृषी पंप जोडले जातील:-

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही पूर्णपणे राज्य सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने एक लाख सौर कृषी पंप उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप उभारण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक टप्पा 18 महिन्यांत राबवून ही योजना पूर्ण करण्यात येणार असून प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.Saur krushi Pump

 

 

अवघ्या 12 हजार रुपयात सौरपंप खरेदी करण्यासाठी येथे करा अर्ज

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now