Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Saur krushi Pump: सौर कृषी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान आहे..! शेतकऱ्यांना मिळत आहे अवघ्या 12 हजार रुपयात सौरपंप, असा करा ऑनलाईन अर्ज

Saur krushi Pump: पुणे, नाशिक जिल्ह्यांसह मराठवाडा विभागात या कुसुम सौर पंपाकडे मोठा कल आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी, सोलापूर, नंदुरबार, नाशिक, धाराशिव आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आपली नोंदणी करता येत नाही. यामागीलकारण कारण म्हणजे या 14 जिल्ह्यांचा कोठा संपला आहे.

मात्र उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये कुसुम सोलार पंपचा कोठा उपलब्ध आहेत, त्यामुळे आजही नोंदणी करता येईल. त्यात पुणे विभागातील SC/ST लाभार्थ्यांसाठी कोठा उपलब्ध आहे. तर सांगली, वर्धा, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा जिल्ह्यातील एसटी श्रेणीसाठी कोठा उपलब्ध आहे.

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, लातूर जिल्ह्यातील एसटी श्रेणीसाठी शेतकऱ्यांसाठी देखील कोठा उपलब्ध आहे. तर नागपूर, पालघर, वाशीम या ठिकाणी देखील SC/ST या दोन्ही प्रवर्गांसाठी कोठा उपलब्ध आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी SC/ST खुल्या प्रवर्गातील कोठा उपलब्ध आहे आणि तुम्ही तेथे नोंदणी करू शकता.

कुसुम सौर योजनेसाठी केंद्र सरकारकडून 30 टक्के अनुदान उपलब्ध आहे. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा 10 टक्के वाटा आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांचा 05 टक्के वाटा असून उर्वरित 60 टक्के/65 टक्के हिस्सा राज्याचा आहे.

कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
1. अर्जदाराचे आधार कार्ड.
2. ओळखपत्र.
3. पत्त्याचा पुरावा.
4. शेतीची कागदपत्रे.
5. बँक खाते पासबुक.
6. मोबाईल क्र.
7. पासपोर्ट आकाराचा फोटो

 

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now