Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Soybean Management: शेतकऱ्यांनो.!! सोयाबीनवर तणनाशक फवारणार असाल तर सावधान! ‘या’ तणनाशकामुळे शेकडो हेक्टर पिक करपले, पहा सविस्तर माहिती

Soybean Management: यंदा मान्सूनचे उशिरा आगमन झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीची कामे लांबली आहेत. राज्याच्या बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र, काही भागात पाऊस झाला असून अशा भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी पूर्ण केली आहे.

काही भागात पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला नसून, पिकासाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने सोयाबीन लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, तिवसा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

खरंतर या तालुक्यात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी आपला उदरनिर्वाहासाठी याच पिकावर अवलंबून आहेत. पावसाने हजरी लावल्यानंतर तालुक्यातील काही भागात सोयाबीन पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

 

 

 

 

कोणत्या औषधाने सोयाबीन पीक करपले आहे येथे क्लिक करून पहा

 

 

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला. मात्र, एका तणनाशक कंपनीच्या औषधांनी फवारणी केल्यानंतर तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक नष्ट झाल्याचे समोर आले आहे. म्हणजेच सोयाबीन पिके करपले आहे.

याचा फटका तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना बसला आहे. कमकुवत मान्सूनमुळे शेतकरी आधीच चिंतेत असून आता या घटनेने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार आहे. आम्‍ही आपल्‍याला कळवू इच्छितो की, तालुक्‍यातील काही भागात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर पेरणी केल्‍यानंतर 48 तासात सुमितोमो कंपनीच्‍या सुमी मॅक्स तणनाशकाची फवारणी केली.Soybean Management

 

 

कोणत्या औषधाने सोयाबीन पीक करपले आहे येथे क्लिक करून पहा

 

मात्र या तणनाशकामुळे तण नव्हे तर सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. या तणनाशकाच्या फवारणीच्या दुष्परिणामामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झाले आहे. तालुक्यातील मोजरी, अंकवडी, मालधुर शिवारात हा प्रकार उघडकीस आला आहे.

कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी केली आहे. 40 ते 50 हेक्‍टरवरील सोयाबीन पीक बाधित झाल्याचे समोर आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीने बाधित क्षेत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदार सर, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनाही देण्यात आले आहे. कृषी अधिकारी कामानिमित्त बाहेर असल्याने शेतकऱ्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्याशी चर्चा केलेली नाही. मात्र आता यावर कृषी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

कोणत्या औषधाने सोयाबीन पीक करपले आहे येथे क्लिक करून पहा

 

 

तर दुसरीकडे कंपनीच्या एरिया मॅनेजरने दरवर्षी पेरणीनंतर लगेच पाऊस पडत असल्याचे सांगितले आहे, मात्र यंदा पेरणीनंतर पाऊस पडल्याने तणनाशकाचे दुष्परिणाम झाले आहेत.

याचा निश्चितच तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना फटका बसणार असून, संबंधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे शक्य होणार आहे.Soybean Management

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now