Soybean Management: तज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने करावा खताचा वापर
एका मीडिया रिपोर्टनुसार, सोयाबीन पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी, पेरणीच्या वेळी महावीर झिरॉन 150 किलो, एमओपी 26 किलो, सिमट्रॉन 4 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो प्रति एकर बेसल डोस म्हणून द्यावे.
यानंतर सोयाबीनचे पीक 25-30 दिवसांचे झाल्यावर एकरी 12 या प्रमाणात युरियाचा वापर करावा. पीक पेरणीनंतर 40-50 दिवसांनी अॅमिट्रॉन-एल 500 मिली/लिटर आणि बोरॉन 250 ग्रॅम/प्रति एकर वापरण्याची शिफारस केली जाते.
शेतकरी मित्रांनो, मात्र कोणतेही खत व औषध वापरण्यापूर्वी तज्ज्ञ व कृषी सेवा केंद्र संचालक यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही (सोयाबीन पीक व्यवस्थापन) फक्त सामान्य माहिती आहे, खत किंवा औषध वापराची शिफारस नाही. यामुळे तुम्ही कोणतेही खत किंवा औषध वापरताना तुमच्या जवळील कृषी सेवा केंद्राचा सल्ला नक्की घ्या… धन्यवाद