Tomato Subsidy: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! आता टोमॅटोलाही मिळणार कांद्याप्रमाणे अनुदान पहा दादा भुसे काय म्हणतात?

Tomato Subsidy: काय म्हणाले पालकमंत्री दादा भुसे?
सध्या राज्यात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत, या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे की, नाशिक बाजार समितीत गेल्या महिन्यात किती टोमॅटोची विक्री झाली आणि कोणत्या भावाने झाली. 

याबाबत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले असून हा अहवाल शासनाला आल्यानंतर लवकरच शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला जाईल, असे सांगत शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देताना दादा भुसे यांनी आपले म्हणणे मांडले आहे. ,

टोमॅटोवर अनुदान मिळण्याची शक्यता
काही महिन्यांपूर्वी राज्यात कांद्याचे भावही घसरले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावर अनुदान जाहीर केले होते. दरम्यान, असे अनुदान मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. टोमॅटो उत्पादकांसाठीही घोषणा होऊ शकते.Tomato Subsidy