weather forecast: ऑगस्ट महिन्याचा अंदाज
दोन-तीन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र आता ऑगस्ट महिन्यात पावसाला ब्रेक लागेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन आठवड्यांत राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
येत्या दोन आठवड्यांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू शकते. आजपासून राज्यातील काही जिल्ह्यांतून पावसाचा जोर कमी होईल, असा महत्त्वाचा अंदाज IMD ने वर्तवला आहे.weather forecast