WhatsApp Helpline Number: कृषीमंत्र्यांनी 18 जुलै रोजी मंत्रालयात कृषी विभागाचे सचिव, कृषी आयुक्त, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाचे संचालक, सहसचिव आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत राज्यातील बनावट बियाणांच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा बियाणांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यायला पाहिजे. असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
कृषी तक्रार व्हाट्सअप हेल्पलाइन नंबर येथे क्लिक करून पहा
यासोबतच शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके याबाबत तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करून तो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करताना शेतकऱ्यांनी आपले नाव गोपनीय ठेवावे. यासोबतच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना निरोप देऊन सदर जागेची तातडीने पाहणी करण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानुसार आता कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते, कीटकनाशकांबाबत तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला असून शेतकरी खाली दिलेल्या क्रमांकावर तक्रार करू शकतात.WhatsApp Helpline Number