Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

World Cup ticket: वर्ल्ड कप तिकिट नोंदणी आजपासून सुरू, जाणून घ्या तिकीट कशी करावी खरेदी..!!

World Cup ticket: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच भारतात या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

 

ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

नव्या वेळापत्रकात भारत-पाकिस्तान सामन्यासह 9 सामने बदलण्यात आले आहेत. यासोबतच आयसीसीने विश्वचषकाची तिकिटेही जाहीर केली आहेत. त्यानुसार चाहत्यांना तिकिटांसाठी पूर्वनोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतरच तुम्ही तिकीट खरेदी करू शकता.

2023 विश्वचषक स्पर्धेची तिकिटे 25 ऑगस्टपासून वेगवेगळ्या टप्प्यात विकली जातील. तिकीट बुक करण्याच्या दिवशी, चाहत्यांना सर्व गैर-भारतीय सराव सामने आणि सर्व गैर-भारतीय विश्वचषक सामन्यांची तिकिटे खरेदी करण्याचा पर्याय असेल. म्हणजेच, भारतीय संघाचे सामने वगळता इतर सर्व सामने आणि सराव सामन्यांची तिकिटे तुम्ही बुक करू शकाल.

 

 

ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

भारतीय संघाचे सामने आणि सराव सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध असतील. अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे 3 सप्टेंबर रोजी उपलब्ध होणार आहेत. सेमीफायनल आणि फायनलची तिकिटे 15 सप्टेंबरला खरेदीसाठी उपलब्ध असतील. तिकीट बुक केल्यानंतर चाहत्यांना हार्ड कॉपीद्वारे स्टेडियममध्ये प्रवेश करावा लागेल. यासाठी विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या शहरांमध्ये तिकीट संकलन काउंटर उभारण्यात येणार आहेत.

BCCI ने तिकिटांची विक्री करण्यासाठी BookMyShow ला तिकीट भागीदार म्हणून सामील केले आहे. चाहत्यांना भारतीय संघाच्या सामन्यांची तिकिटे खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडे 5 टप्प्यांचा पर्याय असेल. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांची तिकिटे 31 ऑगस्ट रोजी उपलब्ध होणार आहेत.

 

 

ऑनलाइन टिकिट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा

 

न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यांची तिकिटे 1 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत. दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स सामन्याची तिकिटे 2 सप्टेंबर रोजी उपलब्ध होतील. भारत-पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या सामन्याच्या तिकिटांची विक्री 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सेमीफायनल आणि फायनलच्या तिकीटांची विक्री 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषक सामन्यांच्या तिकिटांच्या किमती अद्याप ठरलेल्या नाहीत. पण इतर सामन्यांच्या तुलनेत भारतीय संघाच्या सामन्यांची तिकिटे महाग असू शकतात.

सराव सामने आणि स्पर्धांचे ठिकाण

विश्वचषकादरम्यान सराव सामन्यांसह एकूण 12 स्थळे असतील. हे हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता आहेत. हैदराबादशिवाय गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने होणार आहेत.World Cup ticket

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now