health news प्रवास करताना मळमळ होत आहे तर त्यावरील उपाय

health news नमस्कार मित्रांनो आज आपण प्रवास करत असताना काही व्यक्तींना मळमळ आणि उलट्या ची समस्या जाणवते, तर त्यावर आपण कोणते उपाय करू शकतो त्याचबरोबर ते होण्याअगोदर आपण काय करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली जाणार आहे. आपण देखील दूरचा प्रवास करत असलात आणि मळमळ उलट्या चा त्रास होत असेल, तर हा लेख संपूर्ण वाचा हा लेख तुमच्या फायद्याचा ठरेल. बऱ्याच वेळी आपण टॅबलेट घेऊन देखील आपल्याला फरक पडत नाही तर त्यावेळी आपण हे उपाय करून पाहू शकतो.

सध्याच्या या काळामध्ये सगळ्यांच्या आवडीची गोष्ट म्हणजेच प्रवास करणे होय, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे. आपण पाहतो सध्याच्या या काळामध्ये बऱ्याचशा व्यक्ती ह्या वेगवेगळ्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जात असतात परंतु भेट देताना आपण पायी जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण वेगवेगळ्या वाहनांचा वापर करतो जसे की कोणी कारणे प्रवास करतात, तर कोणी बस ने जर जवळचा प्रवास असेल तर आपण टू व्हीलर वर देखील करतो हा प्रवास करत असतात. बऱ्याचशा व्यक्तींना ही समस्या जाणवते कोणाला कार मध्ये ही समस्या जाणवते तर कोणाला बस मध्ये ही समस्या जाणवते. प्रवास करणे देखील एवढे सोपे राहिलेले नाही. दिवसेंदिवस हा त्रास वाढतच चाललेला दिसून येत आहे. पण प्रवास करत असताना ही समस्या का जाणवते याचा आपण कधी विचार देखील केला नसेल. आपण या लेखात पाहणार आहोत की प्रवास करत असताना मळमळ आणि उलटी का होते. जर एखाद्या गोष्टीचे कारण आपल्याला माहित असेल तर आपण त्यापासून सुटका घेऊ शकतो.

health news शाळेतील विद्यार्थी देखील सहलीला जात असतात त्यावेळी त्यांना देखील ही समस्या जाणवते. काही विद्यार्थ्यांना बसने प्रवास करणे खूप आरामदायी त्याचबरोबर चांगले वाटते परंतु काही विद्यार्थ्यांचे बसने प्रवास करत असताना खूप हाल होतात हे आपण बघितलेले असेल. काही विद्यार्थी बसने प्रवास करत असताना खूप एन्जॉय करतात तर काही विद्यार्थ्यांचे या समस्यामुळे हाल होत असतात. प्रवास करत असताना उलटी व मळमळ होते परंतु त्यामुळे आपण सहलीला जाणे टाळत नाही कारण आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणे देखील आवडते. या समस्यामुळे प्रवास करणे टाळले जात नाही त्यामुळेच आपण असे काही उपाय पाहणार आहोत की त्या उपायांनी ही समस्या दूर होईल.

प्रवास जर योग्य पद्धतीने करायचा असेल म्हणजेच आरामदायी प्रवास हवा असेल, तर आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. जर आपले आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण प्रवास करत असताना आपले लक्ष कोणत्याच गोष्टीकडे लागत नाही. आपण पाहतो काही विद्यार्थी किंवा काही व्यक्ती हे उपाशी असताना प्रवास करतात त्यांना तो प्रवास सहन होतो तर काहींना उपाशीपोटीचा प्रवास सहन होत नाही. तर त्यासाठी आपण काय करावे, त्याचबरोबर आपण प्रवास करण्याच्या अगोदर कोणते नियम पाहायला पाहिजेत. तसेच जर आपण प्रवासाला निघालो तर कोणत्या चुका आपल्या हातून होऊ नये, त्याचबरोबर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे आपण या लेखात माहिती करून घेणार आहोत. ही माहिती खरोखरच आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच ज्या व्यक्तींना उलटी व मळमळीची समस्या जाणवते त्यांच्यासाठी तर जास्त महत्त्वाची ठरेल.

दूरवरचा प्रवास करत असताना आपण बाहेरचे पदार्थ जास्त खातो. ते आपल्याला सहन होत नाहीत, त्यामुळे देखील आपल्याला उलटी व मळमळीचा त्रास होतो. दूरवरचा प्रवास करत असताना आपण हॉटेलमधील, त्याचबरोबर गाड्यावरील जे पदार्थ असतात त्यांचे सेवन करतो. त्यावेळी आपण ते पदार्थ चांगले आहेत की नाही याचा काहीही विचार करत नाहीत. बाहेरचे पदार्थ खाण्याच्या वेळी आपण फक्त आपले पोट भरण्याचा त्याचबरोबर चवीचा विचार करत असतो. हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होईल काय या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाहीत. बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना त्रास होतो नंतर आपल्याला तो त्रास सहन होत नाही. नंतर आपल्याला हळूहळू जास्त त्रास व्हायला सुरुवात होते, त्यामुळे आपले मन कोठेच रमत नाही. तर दूरवरचा प्रवास करत असलो तरी देखील आपण लक्षात घेतले पाहिजे की बाहेरील अन्न किंवा पदार्थ हे जास्त प्रमाणात खाऊ नये, त्याचबरोबर ते पदार्थ खाल्ले नाही तर अधिकच चांगले. प्रवास करत असताना जर आपण बाहेरचे पदार्थ टाळले तर आपल्याला होणारा त्रास कमी होईल.

बऱ्याचशा व्यक्तींना प्रवास करत असताना उलटी होण्याअगोदर मळमळ होते व त्यांच्या लक्षात येते की आता आपल्याला उलटी होऊ शकते. उलटी होण्याअगोदर बऱ्याच लोकांना पित्तासारखे त्रास देखील पाहायला मिळतात. अशा व्यक्तींसाठी देखील आपण काही उपायांबद्दल माहिती देणार आहोत. तरी आपण ती माहिती वाचून बघावी.

health news प्रवास करत असताना होणाऱ्या समस्या वरील उपाय

• जर आपण दूरचा प्रवास स करत असतो आणि आपल्याला उलटी आल्यासारखे वाटते तेव्हा आपण आद्रक खाऊ शकतो. जर आपण आद्रक खाल्ली तर आपली येणारी उलटी बंद होण्यास देखील मदत होते. आद्रक ही उलटी व मळमळ वरील सर्वात पहिला व सोपा उपाय आहे. काही व्यक्ती या आद्रकीचा चहा देखील पितात परंतु अद्रकीच्या चहाने पित्त होण्याची शक्यता देखील असते त्यामुळे आपण अद्रकीचा एखादा तुकडा आपल्या सोबत ठेवून जेव्हा आपल्याला मळमळ झाल्यासारखे वाटते तेव्हा तो थोडा थोडा तुकडा चघळत राहिलात तरी देखील आपल्याला या समस्येपासून सुटका मिळेल.

• लिंबू हा या समस्येवरील दुसरा उपाय आहे

ज्या व्यक्तींना दुरचा किंवा जवळचा प्रवास करत असताना मळमळ किंवा उलटीचा त्रास होतो. त्या व्यक्तींनी कधीही प्रवास करत असताना आपल्या सोबत लिंबू ठेवावे. लिंबू चोखल्याने या समस्या पासून आपल्याला आराम मिळतो, परंतु लिंबाची चव ही आंबट असल्यामुळे लिंबू चोखणे हे व्यक्तींना आवडत नाही. ज्या व्यक्तींना लिंबू चोखणे किंवा नुसते लिंबू खाणे आवडत नाही त्यांनी लिंबू शरबत करून आपल्या सोबत ठेवले तरी चलते. लिंबू सरबत चा वापर करून देखील या समस्येपासून सुटका मिळू शकते. आपल्या जवळ असलेले लिंबू सरबत आपण थोडे थोडे पिले पाहिजे तर आपल्याला या समस्या पासून सुटका मिळेल.

• लवंग हा या समस्येवरील उपाय आहे

बरेच जण प्रवास करत असताना त्यांना मळमळ आणि उलटी ची समस्या जाणवते.या समस्येवरील उपाय म्हणून आपण लवंग चा वापर करू शकतो. लवंग चा वापर कसा करायचा हे आपण येथे पाहणार आहोत. आपण प्रवासाला निघण्याच्या अर्धा ते एक तास अगोदर ही लवंग फुड एक कप गरम पाण्यात मिसळून त्या पाण्याला उकळून घ्या. आणि नंतर ते पाणी गाळून घेऊन प्या. लवंग पुढचे पाणी पिल्याने प्रवास करत असताना च्या समस्या पासून आपल्याला आराम मिळेल. त्याचबरोबर प्रवास करत असताना आपण लवंग सोबत ठेवून ती लवंग तोंडात ठेवली तरी देखील आपल्याला उलटीची समस्या जाणवणार नाही.

• संत्र्याचा रस देखील या समस्येवरील उपाय आहे

जर प्रवासादरम्यान आपल्याला उलट्या येत असतील तर आपण संत्र्याचा रस पिलो तर उलट्यांपासून सुटका मिळू शकते. त्याचबरोबर आपण संत्री ची फोड खाल्ल्याने सुद्धा आपली मळमळ व उलट्यापासून सुटका होते. आणि आपण आरामदायी प्रवास करू शकतो.

वरील दिलेल्या सर्व उपाय हे उलट्या व मळमळीच्या समस्या पासून सुटका देणारे आहेत. वरील सर्व उपाय करून देखील आपल्याला जर उलटी होत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला त्याचबरोबर टॅबलेट चा वापर करावा. उलटी झाल्यावर आपल्याला अशक्तपणा येतो त्यावेळी आपण थोडेसे मीठ हे एक चमचा साखरेच्या पाण्यामध्ये मिसळून प्यावे त्यामुळे आपल्याला आरामदायी वाटेल.

Leave a Comment