Thu. Jul 25th, 2024
Waight lossWaight loss

Waight loss नमस्कार मित्रांनो आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही कामांमध्ये व्यस्त असतो त्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आपण पाहतो या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीचे वजन हे वाढतच चाललेले आहे त्याचबरोबर आरोग्य देखील जसे पाहिजे तसे राहिलेले नाही. सगळेजण मनात विचार करतात की आपण चाललो पाहिजे परंतु सकाळी चालायला पाहिजे की संध्याकाळी हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो.परंतु या प्रश्नाचे उत्तर आपल्याला न भेटल्यामुळे आपण सकाळीही चालत नाही त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा चालत नाही त्यामुळे आपले आरोग्य आपले वजन नियंत्रणात राहत नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी सकाळी चालणे फायद्याचे ठरेल की संध्याकाळी चालणे याबद्दल माहिती या लेखात दिली जाणार आहे जर तुम्हाला याबद्दलची माहिती हवी असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण सकाळी चालावे का संध्याकाळी त्याचबरोबर किती वेळ चालावे हे देखील या लेखात सांगितले जाईल.

आपण पाहतो दरवर्षी , नवीन वर्ष आलं की आपण मनामध्ये नव्या वर्षाचा संकल्प करतो की आज पासून आपण चालणे सुरू करून आपले वजन कमी करावे असा मनाशी निर्णय करतो. परंतु केलेला निर्णय हा अमलात आणत नाहीत तो निर्णय अमलात आणण्यासाठी त्याच बरोबर तुम्हाला प्रोत्साहित म्हणून हा लेख बनवला जात आहे. हा लेख वाचून आपण कोणत्या वेळेला चालायला पाहिजे व किती वेळ चालायचे हे मनाशी पक्क ठरवून वजन कमी करू शकतात.

नवीन वर्षाचा केलेला निर्णय हा काही जण चार-पाच दिवस फॉलो करतात, तर काहीजण एक दोन महिन्यापर्यंत असे थोडेच व्यक्ती असतात जे की घेतलेला निर्णय पाळतात. परंतु आपण जर घेतलेला निर्णय व्यवस्थितरित्या फॉलो केला तर निश्चितच आपले वजन कमी होईल. वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळेला चालणे फायदेशीर राहील याचा विचार करून देखील आपण आपला प्लॅन ठरवला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपले आहारावर नियंत्रण ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजेच चालणे हा होय. परंतु चालण्याबरोबरच आपले आहाराकडे लक्ष असायला हवे. निरोगी आणि चांगला त्याचबरोबर वेळेवर आहार घेतला पाहिजे. जर आपण वेळेवर चांगला आणि निरोगी आहार घेतला त्याचबरोबर चालणे हा व्यायाम सतत केला तर आपले वजन निश्चितच कमी होण्यास मदत होईल.

Waight loss आपण पाहतो चालणे हा व्यायाम फक्त वजन कमी करण्या पुरता महत्त्वाचा नसून तो व्यायाम आपल्याला इतर काही आजारांपासून सुद्धा वाचवतो. चालल्याने आपले वजन कमी होते त्याचबरोबर आपल्या शरीरातील उच्च रक्तदाब आणि ज्या व्यक्तींना साखर आहे त्या व्यक्तींची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हा व्यायाम मदत करतो. चालणे हा व्यायाम हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करतो. त्याचबरोबर सध्याच्या या काळामध्ये हृदयविकार हा आजार वाढताना बघायला मिळते. हा आजार कोणत्याही व्यक्तीला कधीही झालेला ऐकायला मिळतो. यावर उपाय म्हणून आपण चालणे हा व्यायाम करू शकतो. हृदयविकाराचा आजार टाळण्यासाठी त्याचबरोबर आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे हा एक महत्त्वाचा व्यायाम मानला जातो. दररोज चालण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यामुळे आपण योग्य वेळ ठरवून दररोज चालायला पाहिजे. चालत असताना आपण दररोज कमीत कमी दहा हजार पावले तरी चालायला पाहिजे असा सल्ला आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून आणि अनुभवी व्यक्तींकडून देण्यात येत असतो. परंतु आपण हा सल्ला ऐकतो आणि तिथल्या तिथेच सोडून देतो असे न करता आपण हा दिलेला सल्ला लक्षात घेऊन दररोज चालायला पाहिजे. कारण हा सल्ला आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

• सकाळी चालण्याचे फायदे

आपण पाहतो की बरेचसे व्यक्ती हे सकाळी चालायला जात असतात तर आपण सकाळी चालण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. सर्वात प्रथम सकाळी किती वेळ चालायला पाहिजे हे पाहू. कमीत कमी 45 मिनिटे सकाळी हलक्या वेळामध्ये चालणे फायदेशीर ठरते. जर सकाळी चालायला जात असलात तर ते फायद्याचे असते कारण ज्या व्यक्तींना श्वास घेण्यासाठी त्रास होतो अशा व्यक्तींसाठी तर सकाळी चालणे फायद्याचे आहे. कारण सकाळी वाहनांची गर्दी जास्त नसते त्यामुळे प्रदूषण होत नाही. जर सकाळच्या वातावरणात प्रदूषण नसेल तर ज्या व्यक्तींना श्वास घेण्यासाठी त्रास होतो त्या व्यक्तींसाठी सकाळी चालणे फायद्याचे ठरते तसेच ज्यांना श्वास घेण्यासाठी त्रास नाही असे व्यक्ती देखील सकाळी चालले तर त्यांच्यासाठी देखील फायदाच आहे. सकाळी चालल्याने आपल्याला दिवसभर येणारा जो आळस येत असतो तो आळस कमी होण्यासाठी मदत होते. सकाळी चालल्याने आपल्याला प्रसन्न व फ्रेश वाटते. जर आपण सकाळी चाललोत तर सकाळच्या हालचालीमुळे आपली चयापचय क्षमता वाढते. तणाव आणि आपल्या मनामध्ये असणारी नकारात्मकता कमी करायची असेल तरी देखील सकाळी चालणे फायद्याचे ठरते. जर आपण सकाळी चालत असाल तर वरी सांगितलेले फायदे आपल्या आरोग्यावर होतात त्यामुळे आपण दररोज चालायला पाहिजे.

• संध्याकाळी चालण्याचे फायदे

बऱ्याचशा व्यक्तींना चालण्याची आवड असते. दिवसभर नोकरी असल्याकारणाने त्यांना सकाळी चालायला वेळ मिळत नाही तर काही व्यक्ती संध्याकाळी चालतात. संध्याकाळी चालने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया संध्याकाळी चालण्याचे फायदे. संध्याकाळी चालणे हे ज्या व्यक्तींना शुगर आहे त्या व्यक्तींसाठी खूपच फायदेशीर ठरते कारण जर अशी व्यक्ती संध्याकाळी चालत असेल तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास हे चालणे मदत करते. जर आपण संध्याकाळी चालायला जात असला तर आपण जे जेवण केले असते त्यामध्ये जे आपण अन्न खातो ते अन्न चांगल्या प्रकारे पचवण्यास देखील मदत होते. त्यामुळे संध्याकाळी चालणे देखील फायद्याचे आहे. दिवसभर आपल्याला काही ना काही ताण त्याचबरोबर कोणत्याही गोष्टीची चिंता वाटत असते तर हा दिवसभरातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. संध्याकाळी चालल्याने देखील आपल्या शरीराला आराम मिळतो. संध्याकाळी चालल्याने आपल्याला रात्री झोप चांगल्या प्रकारे त्याचबरोबर लवकर देखील लागते. चांगली झोप होणे हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते, हे आहेत संध्याकाळी चालण्याचे फायदे.

दोन्ही मधून आरोग्यासाठी कोणती वेळ अधिक फायदेशीर आहे

आपण वरील दोन्ही बाबी पाहिले असतील पण या दोन्ही बाबींमध्ये कोणती वेळ आपल्याला चालण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे याबद्दल माहिती आपण इथे घेत आहोत जर आपल्याला पाहिजे झाले तर आपल्यासाठी कोणता वेळ फायदेशीर आहे हे आपल्याला आपले वेळापत्रकानुसार कळवू शकते जर आपण सकाळी लवकर उठत असाल तर आपल्यासाठी सकाळची वेळ चांगली आहे आणि जर आपल्याला सकाळी उशिरा उठण्याची सवय असेल तर ती सवय सुद्धा चांगली नाही पण आपण रात्री उशिरा झोपली असेल तर सकाळी उशिरा उठल्यावर काही अडचण नाही विचार आपण सकाळी लवकर उठत नसाल तर आपण संध्याकाळी सुद्धा चालू शकता यामुळे आपल्याला फायदा देखील होईल आणि आपल्याला सकाळी लवकर उठण्याची गरज भासणार नाही.

यावरून असे समजून येते की आपण दोन्ही मध्ये कोणत्याही वे चालले तर आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे पण आपण चालणे खूप गरजेचे आहे तर आपण चालत नसाल तर चालण्याची रुटीन चालू करणे आपल्याला खूप फायद्याचे ठरू शकते आपले पाहून आपले इतर सोबत असणारे मित्र देखील आपल्या सोबत चालण्यासाठी येऊ शकतात यामुळे त्यांचा देखील फायदा होईल. सकाळी किंवा संध्याकाळी चालणे खूप फायद्याची दोन्ही वेळचे चांगले फायद्याचे आहेत परंतु आपल्या आरोग्यावर देखील त्या अवलंबून राहते ज्यांना साखर हा आजार आहे त्यांनी संध्याकाळी चालणे फायद्याचे ठरेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *