Tue. Jun 25th, 2024
How To Make RevdiHow To Make Revdi

How To Make Revdi नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये रेवडी बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपण या लेखांमध्ये रेवडी कशी बनवली जाते, रेवडी खाण्याचे आपल्या शरीरासाठी कोणकोणते फायदे आहेत, रेवडी मध्ये किती कॅलरीज असतात आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे वजन हे जास्त असते किंवा वजन वाढत असते त्या व्यक्तीने रेवडीचे सेवन करावे की नाही करावे या बद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. जर आपल्याला रेवडी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. सर्वप्रथम आपल्याला रेवडी म्हणजे काय हे माहीत असणे गरजेचे आहे तरच आपल्याला संपूर्ण माहिती समजेल.

 

रेवडी म्हणजे काय
रेवडी म्हणजे गुळाच्या किंवा साखरेच्या पाकात बनवलेली वडी. रेवडी बनवत असताना आपण सर्वप्रथम तिळाचा वापर करतो. “रेवडी म्हणजेच गुळात किंवा साखरेच्या पाकामध्ये बनवलेली तिळाची वडी होय.”
रेवडी आपण गुळाच्या किंवा साखरेच्या पाकात बनवू शकतो. एकाच वेळी गुळ आणि साखर आपण वापरत नाहीत. जेव्हा आपल्याकडे गुळ उपलब्ध असेल तेव्हा आपण गुळाचा वापर करतो आणि जेव्हा साखर उपलब्ध असेल तेव्हा साखरेचा वापर करतो.

 

How To Make Revdi रेवडी चा वापर कोठे व कधी केला जातो

आपण पाहतो की जास्त प्रमाणात रेवडीचा वापर हा संक्रांतीच्या वेळेस केला जातो. तसेच कोणत्याही ठिकाणी यात्रेच्या वेळी त्याचबरोबर देवाच्या ठिकाणी प्रसाद म्हणून देखील रेवडी उपलब्ध असते. रेवडी ही सर्वांच्या आवडीची आहे. म्हणून आताच्या या काळामध्ये रेवडी कोणत्याही ठिकाणी सहज मिळून जाते. रेवडी गोड असल्याकारणाने ती सर्वांनाच जास्त प्रमाणात आवडते. आपण जर एखाद्या यात्रेला किंवा देवस्थानी गेलो तर रेवडी खाल्ल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय परत येत नाही. जेव्हा आपण रेवडी खाऊ तेव्हाच आपल्याला यात्रेला व देवाच्या ठिकाणी गेल्यासारखे वाटते.
संक्रांतीच्या वेळी असे म्हणले जाते की ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ त्यावेळी देखील जास्त प्रमाणात रेवडीचा वापर होतो.

 

रेवडी कशी बनवतात

रेवडी खाण्यासाठी खूप चविष्ट असते त्याचबरोबर ती खायला देखील सर्वांना आवडते तर आता आपण पाहूया की रेवडी नेमकी कशी बनवतात .
रेवडी बनवत असताना सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवायची. त्यानंतर त्यामध्ये किसलेला किंवा बारीक केलेला गूळ टाकायचा त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचे नंतर बारीक गॅसवर तो गूळ पाण्यात विरघळेपर्यंत मध्ये मध्ये हलवत राहायचे म्हणजेच गुळाचा पाक तयार करून घ्यायचा. त्या गुळाच्या पाकाला पाच ते सहा मिनिट उकळी फुटू द्या. पाक हा गोळीबंद होऊ द्यायचा. नंतर तो गोळीबंद झालेला पाक एका ताटामध्ये घ्यायचा आणि तो थंड होण्यासाठी थोडासा पसरून घ्यायचा. बाजूला दुसऱ्या ताटाला थोडंसं तूप किंवा तेल लावायचे तो थंड झालेला गुळाचा पाक त्या ताटामध्ये टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा नंतर तो गोळा दोन्ही हाताने ओढेल तेवढा ओढायचा पाच-सहा वेळेस तो दोन्ही हातात धरून ओढायचा म्हणजेच त्या पाकाचा कलर बदले पर्यंत ही प्रोसेस करायची. नंतर तो जाडसर असा एक लाईन मध्ये घ्यायचा म्हणजेच दोरी सारखं त्याला बनवून घ्यायचं. नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. त्यानंतर कढई गरम व्हायला ठेवायची त्यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे गॅस हा बारीक ठेवायचा नंतर त्याच्यामध्ये ते कट केलेले छोटे छोटे तुकडे त्या तिळामध्ये म्हणजेच कढईत टाकायचे नंतर शिल्लक राहिलेले तीळ बाजूला ठेवायचे आणि फक्त रेवडी काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण रेवडी बनवू शकतात,ही रेवडी बनवण्याची पद्धत जर आपल्याला समजत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर आपण युट्युब वर सर्च करू शकता रेवडी कशी बनवतात म्हणून नंतर व्हिडिओ येईल त्या व्हिडिओ मधून माहिती घेऊन सुद्धा आपण आपल्या घरी रेवडी बनवू शकतात.

 

रेवडी मध्ये किती कॅलरीज असतात.

रेवडी ही गुळ आणि साखरेच्या पाकापासून त्याचबरोबर त्यामध्ये तिळाचा वापर करून बनवली जाते. रेवडीच्या एका दहा ग्राम च्या तुकड्यांमध्ये 38 ते 39 कॅलरीज असतात.
रेवडी मध्ये पौष्टिक तथ्य देखील असते ते म्हणजेच प्रथिने कार्बोदके आणि फायबर.

 

रेवडीचे आपल्या शरीरासाठी फायदे

रेवडीचे आपल्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी भरपूर फायदे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. रेवडी खाण्यासाठी सर्व जणांना फार आवडते. रेवडी मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते परंतु त्याचे शरीरासाठी सुद्धा खूप फायदे असतात. आपण जर रेवडीचे सेवन करत असाल तर ते आपल्या केसांच्या वाढीस मदत करते त्याच बरोबर आपली पचन संस्था सुधारण्यास देखील मदत करते. अरे वडीला एक ऊर्जेचा चांगला स्रोत म्हणून देखील ओळखले जाते त्याचबरोबर रेवडी खाल्ल्याने आपले हाडांचे आरोग्य आहे ते वाढते. आज कालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांचा रक्तदाबहार कमी जास्त होत असतो तो रक्तदाब स्थिर करण्याचे काम देखील रेवडी करते. आपल्या त्वचेसाठी देखील रेवडी फायदे ची ठरते.

 

जाड आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रेवडी खावी का ?
रेवडी खाण्यासाठी सर्वांना आवडते परंतु रेवडीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आपण असे समजतो की रेवडी ही गुळापासून बनलेली असते तरीसुद्धा ती शुगर असणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी चांगली नाही. म्हणून मधुमेह व वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींनी रेवडी खाणे जास्तीत जास्त टाळावे.

 

आपण या लेखांमध्ये रेवडी म्हणजे काय त्याचबरोबर रेवडी कशी बनवायची ही संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे. ही तुमच्यासाठी खूप फायद्याची प्रोसेस आहे. तुम्ही घरी रेवडी बनवली तर तुम्हाला कोठेही यात्रेच्या ठिकाणी रेवडी विकत घेण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. घरी बनवलेली रेवडीची चव ही वेगळीच लागते म्हणजेच आपण बनवलेल्या कोणत्याही पदार्थाची चवही आपल्याला विकत घेतलेल्या पदार्थापेक्षा जास्तच छान लागते. त्यामुळे आपण घरी बनवलेली रेवडी ही जास्त आवडीने खातो तसेच आपण स्वतः बनवलेल्या रेवडीचा देवस्थानी प्रसाद म्हणून देखील वापर करू शकतो.

 

आपल्याला जर चांगल्या प्रकारे रेवडी बनवता आली तर आपण नंतर रेवडीचा व्यवसाय देखील करू शकतो. आपण आपल्या घरी रेवडी बनवून नंतर एखाद्या देवस्थाने किंवा यात्रेच्या ठिकाणी त्याचबरोबर गावामध्ये जे बाजार भरतात त्या बाजारामध्ये देखील या रेवड्या विकू शकतो आणि त्यातून चांगला नफा मिळू शकतो. अरे एवढ्या बनवण्यासाठी जास्त खर्च देखील लागत नाही कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी रेवड्या बनवू शकतो. आपण वरी दिलेल्या लेखात रेवड्या बनवण्याची प्रोसेस बघितली आहे तर आपल्या लक्षात आले असेल की यासाठी कमी साहित्य लागते त्याचबरोबर खर्च देखील कमी लागतो.

 

तिळाची रेवडी विकत आणण्यापेक्षा आपण ती घरी बनवलेली कितीतरी फायदेशीर ठरते. कारण घरी बनवलेली रेवडी ही चविष्ट लागते. आपण संक्रांतीच्या वेळेस तिळगुळ वाटण्यापेक्षा घरी तिळाची रेवडी बनवून वाटली तर ते अतिशय चांगले वाटते त्याचबरोबर चवीला चविष्ट देखील लागते. आपण संक्रांतीच्या वेळेस जर घरी बनवलेली रेवडी वाटत असलो तर लहान मुले त्याचबरोबर बायका सगळेजण खूप खुश होऊन ती रेवडी खातात. आपल्याला ती रेवडी वाटायला देखील चांगली वाटते. कारण ती आपण स्वतःच्या हाताने घरी बनवलेली असते म्हणून ती रेवडी लहान मुलांना व बायकांना संक्रांतीच्या दिवशी वाटताना आपल्याला आपल्या मनामध्ये खूप आनंद होत असतो.

 

How To Make Revdi रेवडी सगळ्यांना खायला आवडते परंतु रेवडी खात असताना आपण आपल्या आरोग्याचाही विचार करायला पाहिजे. रेवडी ही गुळापासून जरी बनली तरी ती आरोग्यासाठी जास्त खाणेदेखील चांगले नाही. आपण विकत घेत असलेले रेवडी ही गुळापासून बनवलेली आहे की साखरेपासून हे आपण ओळखू शकत नाही आपण रेवडी घेतल्याबरोबरच ती खायला सुरुवात करतो परंतु रेवडी खाणे चांगले आहे पण ती एका लिमिटमध्येच खायला हवी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते म्हणजेच आपले आरोग्यावर त्याचे परिणाम होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *