Tue. Jun 25th, 2024
businesses are related to agriculturebusinesses are related to agriculture

businesses are related to agriculture नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखात शेती विषयी त्याचबरोबर शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायांबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजचा हा लेख शेतकऱ्यांसाठी खरोखरच फायद्याचा ठरेल. आपण देखील शेती करत असाल तर शेतीशी निगडित कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न मनात असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. शेतीशी निगडित असणारे त्याचबरोबर त्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळणाऱ्या व्यवसायांबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

सर्व शेतकरी हे चिंतेत असतात की आपण शेती करत असताना शेतीशी निगडित कोणता व्यवसाय करावा. परंतु त्यांना सुचत नाही की कोणता व्यवसाय केल्यानंतर आपल्याला जास्त फायदा होईल तर याबद्दलच आपण या लेखात माहिती करून घेणार आहोत. शेतकरी शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात त्याचबरोबर त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घेत असतात. तरीदेखील शेतकऱ्यांना शेतीबरोबर एखादा जोड व्यवसाय करावा अशी इच्छा असते, परंतु त्यांच्यापुढे खूप सारे व्यवसाय असतात त्यामुळे त्यांना कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाहीत, तसेच त्यांना प्रत्येक व्यवसायाबद्दल माहिती नसते. त्यामुळे शेतकरी गोंधळात पडतात. जर आपल्याला जोड व्यवसाय करायचा असेल तर आपण हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा म्हणजेच आपल्याला कोणता व्यवसाय करावा याबद्दल माहिती मिळेल.

businesses are related to agriculture शेती हा व्यवसाय प्रामुख्याने सर्व व्यक्ती करत असतात. हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते. कधी शेतामध्ये उत्पन्नात चांगले होते तर कधी उत्पन्न चांगले येत नाही त्यामुळे शेतकरी खूप चिंताग्रस्त असतात. शेतकऱ्याने चिंताग्रस्त न होता शेतीशी निगडित एखादा जोड व्यवसाय केला तर त्यांना डबल फायदा होईल. शेतीशी निगडित भरपूर जोड व्यवसाय देखील आहेत त्यातून सुद्धा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. शेतीशी निगडित जोड व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी किंवा जास्त गुंतवणूक देखील लागते. पण शेतीशी निगडित असा जोड व्यवसाय सुरू केला तर त्यातून फायदा देखील तसाच होत असतो. जोड व्यवसायातून जास्त नफा मिळतो.

• शेती करत असताना त्याबरोबर जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन करू शकतो.

शेळी पालन हा शेतीशी निगडित व्यवसाय आहे. शेळी पालन हा व्यवसाय करण्यासाठी किती गुंतवणूक करायची हे आपल्या वर अवलंबून असते. या व्यवसायातून आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. शेतीशी निगडित जर जोड व्यवसाय करायचा म्हणलं तर शेळी पालन हा सर्वात चांगला व जास्त फायदेशीर असा व्यवसाय आहे.

• शेती करत असताना जोड व्यवसाय म्हणून फुल शेती करू शकतो.

आपण कोणतीही शेती करत असलो तरी त्यात सोबत आपण फुल शेती देखील करू शकतो. या शेतीमध्ये कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळतो त्याचबरोबर या शेतीला जास्त मेहनत करण्याची गरज देखील लागत नाही. ही शेती आपण सहज करू शकतो. ही शेती करत असताना आपण योग्य त्या वेळेवर योग्य त्या फुलांची लागवड करायला पाहिजे, तर आपल्याला या शेतीतून जास्त नफा मिळेल.

• कुक्कुटपालन हा देखील शेतीशी निगडित जोड व्यवसाय आहे.

शेतीशी निगडित जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन ला ओळखले जाते. कुकुट पालन हा व्यवसाय गावाकडे बरेच करतात व त्यातून चांगला नफा मिळवतात. कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये देखील किती गुंतवणूक करायची हे आपल्यावर अवलंबून असते. या शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायामध्ये आपण कमीत कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळू शकतो. त्याचबरोबर हा व्यवसाय आपण घरबसल्या देखील करू शकतो.

• औषधी वनस्पतीची लागवड करणे हा देखील शेतीशी निगडित व्यवसाय आहे.

सर्वच शेतकरी शेती हे करत असतात परंतु औषधी वनस्पतीची लागवड कोणतेच शेतकरी करत नाहीत. तर आपण औषधी वनस्पतीची लागवड केल्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होईल. औषधी वनस्पतीची शेती केल्यानंतर देखील आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळेल. आपल्याकडे जर जास्त जमीन असेल आणि औषधी वनस्पती कशी करायची याबद्दल माहिती असेल तर आपण औषधी वनस्पतीची शेती करून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. औषधी वनस्पतीचा वापर करून आपल्या आजारावर योग्य ते उपचार करण्याची ही खूप जुनी पद्धत आहे. त्यामुळे या व्यवसायातून आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.

• दुग्ध व्यवसाय हा देखील शेतीशी निगडित जोड धंदा आहे.

शेतीशी अत्यंत निगडित असणारा हा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. सध्याच्या काळामध्ये या व्यवसायाला खूप मार्केट आहे. आपण पाहतो डेरी वरती दुधाला खूप मागणी आहे त्यामुळे हा व्यवसाय करणे देखील फायदेशीर ठरेल. हा व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे योग्य त्या प्रमाणात भांडवल ची आवश्यकता असते. जर आपल्याकडे योग्य त्या प्रमाणात भांडवल असेल आणि आपण हा व्यवसाय चालू केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

 

• तुळस लागवड हा देखील शेतीशी निगडित व्यवसाय आहे

शेती करत असताना आपल्याला शेतीशी निगडित व्यवसाय करायचा असेल तर त्यामध्ये तुळस लागवड हा देखील व्यवसाय येतो. परंतु तुळस लागवड हा व्यवसाय सर्वच शेतकरी करत नाहीत ज्यांना इच्छा आहे तेच हा व्यवसाय करत असतात. हा व्यवसाय देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. तुळशीमध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आढळून येतात त्यामुळे तुळशीचा उपयोग हा बरेचसे औषधे बनवण्यासाठी केला जातो. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे या व्यवसायातून आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो कारण तुळस लागवड हा व्यवसाय जास्त शेतकरी करत नाहीत. हा व्यवसाय करणारे शेतकरी खूप कमी आहेत ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे तेच शेतकरी हा व्यवसाय करतात. तुळस लागवड करत असताना देखील आपल्याला जास्त गुंतवणुकीची गरज भासत नाही. या व्यवसायाला देखील आपण कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय असे म्हणू शकतो. आपल्याकडे तुळस लागवड ही खूप कमी प्रमाणात दिसून येते.

या लेखात आपण शेतीशी निगडित असणाऱ्या व्यवसायाबद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतीशी निगडित एखादा जोड व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी यापैकी कोणताही एखादा जोड व्यवसाय करून चांगल्या प्रमाणात नफा मिळू शकतात. कोणताही जोड व्यवसाय करण्याअगोदर त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे अत्यंत गरजेचे असते. ज्या व्यवसायाबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती आहे तो व्यवसाय आपण शेतीशी निगडित जोड व्यवसाय म्हणून करू शकतो आणि त्यातून चांगला नफा घेऊ शकतो. कोणताही जोड व्यवसाय चालू करत असताना आपण आपल्याकडे व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारे भांडवल उपलब्ध आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते.

आपण नवीन व्यवसाय सुरू करताना व्यवसाय हा आपल्याला माहिती असणारा करावा कारण की जर आपल्याकडे व्यवसायाची पुरेपूर माहिती नसेल तर त्या व्यवसायामध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाहीत कारण कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेस होण्यासाठी त्या व्यवसायाबद्दल संपूर्ण अशी माहिती असणे खूप गरजेचे आहे आपण समाजामध्ये पाहतोच की अनेक व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करतात पण त्यांना व्यवसायाबद्दल पुरेपूर माहिती नसल्यामुळे काहीच महिन्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू केलेला बंद करावा लागतो.

businesses are related to agriculture आता तर नवीनच पद्धत आली ती म्हणजे फ्रेंचायजी घेणे अनेक व्यक्ती आता चहाची सुद्धा फ्रेंचायजी घेत आहेत अनेक वेळा फ्रॅंचाईजी घेतल्याने सुद्धा नुकसान होऊ शकते कारण काही फ्रॅंचायजीच महागड्या असतात पण त्या महागड्या फ्रॅंचायजी मध्ये काही चांगल्या सुद्धा फ्रेंचायजी असू शकतात त्यामधील उदाहरण मध्ये येवले चहाची फ्रंचयाजी आपण पाहतोच की कुठे बी येवले चहाची फ्रंचाजी असल्यास त्या ठिकाणी गर्दी दिसून येते पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये नवनवीन फ्रॅंचाईजी येत आहेत, परंतु सगळ्याच फ्रॅंचाईजी चांगल्या चालत नाहीत आणि फ्रेंचायजी घेणाऱ्याला नुकसान भोगावे लागते कारण त्या फ्रॅंचायजीसाठी आणि दुकान उघडण्यासाठी जास्त पैसे खर्च होत असतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *