Tue. Jun 25th, 2024
work from home jobswork from home jobs

work from home jobs नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत घरबसल्या व्यवसाय करून चांगला नफा मिळू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती. दैनंदिन जीवनामध्ये सर्वांनाच पैशाची गरज असते, त्याचबरोबर सर्वांना सरकारी नोकरी किंवा नोकरी मिळत नाही. त्यामुळे बरेच जण घरी बसून कोणता व्यवसाय करता येईल का या शोधात असतात तर आज या लेखांमध्ये असे काही व्यवसाय पाहणार आहोत की जे आपण घरबसल्या करू शकतो आणि त्यातून आपला दैनंदिन खर्च भागवू शकतो त्याचबरोबर तो व्यवसाय करून त्यामध्ये आपल्याला चांगला नफा मिळतो.

business idea घरबसल्या आपण बरेचसे व्यवसाय करू शकतो. अशी व्यवसाय पाहणार आहोत जे महिला आणि पुरुष दोघे मिळून देखील करू शकतात आणि फक्त महिला देखील व्यवसाय करू शकतात आणि त्यातून चांगला नफा मिळवू शकतात. घरगुती व्यवसाय करायचा म्हणले की त्यामध्ये गुंतवणूक लागते परंतु जास्त गुंतवणुकीची गरज नाही थोड्या गुंतवणुकीपासूनच आपण घरबसल्या व्यवसाय चालू करू शकतो. या लेखामध्ये आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत की जे घरबसल्या सहजासहजी करता येतील.त्याचबरोबर कमी गुंतवणुकीत करता येतील आणि त्यातून चांगला नफा मिळेल.

कोण कोणते घरगुती व्यवसाय करता येतील

• स्टेशनरी दुकान

घरबसल्या आपण स्टेशनरी दुकान म्हणजेच छोट्या छोट्या वस्तू विकायला चालू करू शकतो आणि त्यातून भरपूर असा नफा मिळू शकतो. स्टेशनरी मध्ये आपण आपल्या आवडीनुसार त्याचबरोबर मागणीनुसार वस्तू ठेवता येतात. आपल्या घरी आपण थोड्याशा जाग्यामध्ये किंवा जिथे राहत आहोत तिथेच हा व्यवसाय करू शकतो तसेच हा व्यवसाय महिला व पुरुष दोघांनाही करता येतो.

• कपड्याची दुकान
घरबसल्या आपण कपड्याची दुकान देखील टाकू शकतो त्यामध्ये सर्वप्रथम आपण ब्लाऊज पीस, साडी , आणि रेडिमेड ब्लाऊज पासून सुरुवात करता येते. हा व्यवसाय करत असताना आपल्याला सुरुवातीला आपले पैसे गुंतावे लागतात नंतर त्यातून आपल्याला चांगला नफा मिळवाटा येतो.

• मिशन काम
घरबसल्या आपण मिशन काम देखील करू शकतो त्यामध्ये सुद्धा भरपूर नफा मिळवता येतो जर आपल्याला मिशन काम येत नसेल तर आपण सुरुवातीला क्लास करू शकतो किंवा युट्युब च्या मदतीने देखील मिशन काम शिकू शकतो. युट्युब ला पाहून आपण त्यातील सर्व गोष्टी शिकू शकतो. हा व्यवसाय महिलांसाठी जास्त फायद्याचा आहे. मिशन काम हा व्यवसाय पुरुष देखील करू शकतात परंतु महिलांचा व्यवसाय हा जास्त प्रमाणात चालतो तसेच त्यांना त्यातून चांगला नफा मिळवता येतो.

• टिविशण (classes)
जर सुशिक्षित असाल तर आपण घरबसल्या पहिली ते चौथीच्या किंवा पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस देखील घेऊ शकतो. क्लासेसला आपण एक विद्यार्थ्यापासून ते वीस पंचवीस विद्यार्थ्यांपर्यंत सुरुवात करू शकतो ती सुद्धा घरबसल्या आपण क्लास घेऊ शकतात. क्लासेस मधून आपल्याला चांगला नफा मिळतो त्याचबरोबर क्लासेस घेण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज लागत नाही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा हा घरगुती व्यवसायआहे . या व्यवसायाची सुरुवात जरी थोड्या विद्यार्थ्यांपासून होत असली तरी तो व्यवसाय कालांतराने वाढू शकतो त्याचबरोबर या क्लासेस मध्ये आपण नंतर खूप बदल करू शकतो. कालांतराने आपण हे क्लासेस डिजिटल पद्धतीने देखील घेऊ शकतो. आपले शिक्षण जर जास्त झालेले असेल किंवा आपल्याला कॉम्प्यूटर बद्दल नॉलेज असेल आणि आपली ही एमएससीआयटी झालेली असेल तर आपण क्लासेस घेत घेत नंतर ज्या विद्यार्थ्यांची एम एस सी आय टी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आपण एमएससीआयटी क्लासेस देखील घेऊ शकतो. जर एम एस सी आय टी ची क्लासेस चालू केले तर आपल्या उत्पन्नाचा स्रोत सुरुवात होईल.

• मेस चालू करु शकतात
मेस म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहू तर मेस म्हणजेच जे लोक दुसऱ्या गावावरून आपल्या गावामध्ये काही कामानिमित्त राहत असतील किंवा काही विद्यार्थी शिक्षणासाठी स्वतःचे गाव सोडून आपल्या गावात राहत असतील तर त्यांना जेवणाची व्यवस्था म्हणून आपण जर त्यांना जेवण बनवून द्यायला लागलो तर त्याला मेस असे म्हणतात.
मेस म्हणजेच जेवणाचा डब्बा पुरवने किंवा जेवणाची सोय करणे होय. मेस हा व्यवसाय स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर व खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून आपण घरबसल्या भरपूर फायदा मिळू शकतो. मेसी चा व्यवसाय देखील सुरुवातीला थोड्या प्रमाणापासून जास्त प्रमाणाकडे चालत जातो. आपण जर मेस हा व्यवसाय चालू केला तर त्या विद्यार्थ्यांची देखील जेवणाची व्यवस्था होते त्याचबरोबर आपल्याला पण त्यातून चांगला फायदा मिळतो. या व्यवसायाला देखील जास्त गुंतवणुकीची गरज नाही आपण आपल्या घरात असणाऱ्या साहित्य पासूनच या व्यवसायाची सुरुवात करू शकतो. मेस लावणाऱ्या विद्यार्थी व व्यक्तींकडून आपण महिन्याच्या महिन्याला पैसे मिळू शकतो आणि त्यातून आपला घर खर्च त्याचबरोबर मेस हा व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करू शकतो, त्यामुळे हा व्यवसाय करणे खूप सोपे व लाभदायक आहे. आपण जर मेस हा व्यवसाय सुरू करत असलो तर या व्यवसायातून आपण एका व्यक्तीकडून कमीत कमी दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त तीन-चार हजार रुपये पर्यंत महिना मिळवतो. तसेच आपण जर दहा व्यक्तींना डब्याची सोय करत असाल तर आपल्याला घरबसल्या वीस ते तीस हजार रुपये महिना मिळतो.

 

• विणकाम
घरगुती व्यवसायामधीलच विणकाम हा एक फायद्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय प्रत्येकालाच जमेल अस नाही परंतु जर प्रयत्न केले तर प्रत्येक जण हा व्यवसाय देखील करू शकतो. विणकाम व्यवसाय करत असताना देखील आपल्याला जास्त गुंतवणुकीची गरज नाही कमी गुंतवणूक करून आपण यातून सुद्धा जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. आपण जर विणकाम हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असाल तर युट्युब ला जाऊन विणकाम बद्दल शोधले तर आपल्याला भरपूर माहिती मिळते. विणकाम या व्यवसायाची फक्त माहिती असून चालत नाही ते कसे करतात हे बघणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यामुळे आपण यूट्यूबला शोधून एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की विणकाम ह्या व्यवसायाची सुरुवात कशी करावी. विणकाम करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज असते हे देखील आपण युट्युब ला शोधू शकतो. युट्युब ला शोधत असताना आपण एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजेच आपल्याला विणकाम करायचा आहे परंतु कोणतं कशा पद्धतीचे विणकाम करायचे आहे हे आपल्या स्वतःला माहीत असणे गरजेचे आहे. विणकाम मध्ये भरपूर प्रकार असतात त्यातील आपल्याला ज्या प्रकाराबद्दल माहिती पाहिजे आहे ते आपण यूट्यूबला सर्च करून पाहू शकतो. आपण कोणतीही विणकाम युट्युब ला सर्च करून ते कसे करतात याबद्दल माहिती त्याच बरोबर व्हिडिओ देखील पाहू शकतात आणि तिथून विणकाम कसे करतात आपल्याला शिकता येते. विणकाम मध्ये दाराचा पडदा, ताटावरचा झाकण, गणपती, ससा ,बदक आणि मोर या वस्तू देखील बनवू शकतात. जर आपल्याला लोकरीचे विणकाम करायचे असेल तर त्यामध्ये मुख्यतः गरज असते ती नोकरीची आणि लोकरी पासून आपण ससा, बदक आणि मोर तसेच दुसऱ्या कोणत्याही वस्तू बनवू शकतो. ज्या आपल्याला माहित आहेत किंवा युट्युब ला शोधून देखील आपल्याला नवनवीन प्रकारच्या वस्तू बनवता येतील.

आपण या लेखांमध्ये घरबसल्या कोण कोणते व्यवसाय करता येतील याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्ही सुद्धा घरगुती व्यवसायाबद्दल माहिती शोधत असाल तर हा लेख आपण शेवटपर्यंत नक्की वाचावा. तसेच यामध्ये कोणत्या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल तसेच हा व्यवसाय करताना आपल्याला किती नफा मिळेल याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आपल्याला जर हे व्यवसाय सोडून अजून दुसरे व्यवसाय करण्याची इच्छा असेल तरीसुद्धा आपण ते व्यवसाय करू शकतात आणि आपल्याला कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याबद्दलची माहिती युट्युब ला शोधल्यानंतर सहज मिळून जाते.

 

घरगुती व्यवसायाला किती गुंतवणूक लागते.

घरगुती व्यवसाय करायचं म्हणलं की आपल्याला सर्वात पहिला प्रश्न पडतो की त्या व्यवसायासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल परंतु त्याबद्दलच आपण आज या लेखात पाहणार आहोत. घरगुती व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज नाही आपण कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये गुंतवणूक करून एखादा कोणताही व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यातून चांगल्या प्रमाणात नफा मिळवता येतो. घरगुती व्यवसायामध्ये आपल्याला स्वतःचे जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. परंतु मेहनत मात्र करावी लागते. आपण बघतो कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करायची म्हणलं तर त्यामध्ये आपल्याला मेहनत तर करावीच लागणार आहे, त्यामुळे आपण घरबसल्या व्यवसायामध्ये देखील मेहनत करून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *