Thu. May 23rd, 2024
Holidays 2024Holidays 2024

Holidays 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत 2024 वर्षातील शाळेच्या सुट्ट्याची यादी. आपल्याला माहीतच आहे वर्ष बदलले की सर्व विद्यार्थ्यांना आतुरता असते या वर्षामध्ये किती सुट्ट्या असतील, त्याचबरोबर 26 जानेवारी कोणत्या दिवशी येते, म्हणजे आपल्याला सुट्टी मिळेल. 15 ऑगस्ट कधी येते सर्वांना हा विचार येत असतो. त्याचबरोबर बाकी किती सुट्ट्या आहेत याचा विचार प्रत्येक शाळेतील विद्यार्थी हा करत असतो तर आपण या लेखांमध्ये या शाळेच्या सुट्ट्या बद्दल जाणून घेणार आहोत.आज आपण या लेखांमध्ये 2024 या वर्षांमध्ये किती सुट्ट्या आहेत व कोणत्या तारखेला कशाची सुट्टी आहे हे देखील पाहणार आहोत. आपल्याला जर 2024 या वर्षांमधील संपूर्ण सुट्ट्या माहिती करून घ्यायच्या असतील तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखांमध्ये खरोखरच आपल्याला शाळेतील सुट्ट्यांची यादी त्याचबरोबर सर्व लाल तारीख तसेच कोणत्या सुट्टीला कोणते सण आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

नवीन वर्ष आले की कॅलेंडर बदलते तर आपण लगेच कॅलेंडरमध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती सुट्ट्या आहेत हे बघत असतो परंतु तसे बघण्यापेक्षा आपल्याला या लेखांमध्ये कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत प्रत्येक महिन्यात किती सुट्ट्या आहेत. कोणते सण कोणत्या महिन्यात येतात आणि कोणत्या वारी येतात हे देखील आपण पाहणार आहोत.2024 या वर्षातील सुट्ट्यांच्या यादीमध्ये आपण रविवार धरणार नाहीत फक्त मधल्या वारी ज्या सुट्ट्या असतात त्याच सुट्ट्यांची यादी या लेखात दिली जाणार आहे. रविवारच्या सुट्ट्या ह्या सुट्ट्या व्यतिरिक्त असतील.

• जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी

जानेवारी 2024 या वर्षातील आपण सुट्ट्यांची यादी पाहणार आहोत. जानेवारी महिन्यामध्ये फक्त एकच सुट्टी येते ती म्हणजेच 26 जानेवारी ची. 26 जानेवारीला गणराज्य दिन असेही म्हणले जाते. 26 जानेवारी ला शुक्रवार येत आहे. तर जानेवारी महिन्यात शुक्रवारी ची सुट्टी मिळणार आहे.

• फेब्रुवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी

फेब्रुवारी 2024 या महिन्यात कोणत्या सुट्ट्या येणार आहेत हे पाहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील एकच सुट्टी आहे. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सुट्टी राहील. 19 फेब्रुवारी सोमवारी येत आहे त्यामुळे शाळेला सोमवारची सुट्टी देण्यात येईल.

• मार्च महिन्यातील सुट्ट्यांची यादी

मार्च या महिन्यातील सुट्ट्यांची यादी पाहणार आहोत. मार्च महिन्यामध्ये सर्व किती सुट्ट्या आहेत व कोणत्या वारी येतात हे जाणून घेऊया. मार्च महिन्यात एकूण तीन सुट्ट्या आहेत. गुड फ्रायडे, धुलीवंदन आणि महाशिवरात्री या तीन सुट्ट्या मार्च महिन्यात येतात. चला तर मग जाणून घेऊ किती तारखेला व कोणत्या वारी या सुट्ट्या येतात त्याबद्दल, 8 मार्चला महाशिवरात्री आहे आणि त्या दिवशी शुक्रवार येतो तर मार्च महिन्यात शुक्रवारची सुट्टी आहे. 25 मार्चला धुलीवंदन आहे आणि त्या दिवशी सोमवार येतो तर मार्च महिन्यात सोमवारची देखील सुट्टी आहे आणि 29 मार्चला गुड फ्रायडे आहे त्या दिवशी देखील शुक्रवार आहे तर मार्च महिन्यात शुक्रवारची देखील सुट्टी आहे. मार्च महिन्यात दोन शुक्रवारी आणि सोमवारी सुट्टी आहे तर सर्व सुट्ट्या मिळून मार्च महिन्यातील तीन सुट्ट्या होतात.

• एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची यादी
Holidays 2024 एप्रिल महिन्यात कोणकोणत्या सुट्ट्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. एप्रिल महिन्यामध्ये देखील सर्व सुट्ट्या मिळून तीन सुट्ट्या आहेत. त्या सुट्ट्या कोणत्या सणाच्या व कोणत्या वारी आहेत ते पाहूया, एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा, रामजान ईद आणि श्रीराम नवमी मुळे तीन सुट्ट्या येतात. 9 एप्रिल ला गुढीपाडवा आहे आणि त्या दिवशी मंगळवार येतो तर त्या दिवशीची सुट्टी मिळणार आहे. 11 तारखेला रमजान ईद आहे आणि त्या दिवशी गुरुवार येतो तर त्या दिवशी सुट्टी राहील. तसेच 17 एप्रिल ला श्रीराम नवमी आहे आणि वार बुधवार येतो त्या दिवशी देखील श्रीराम नवमी निमित्त सुट्टी राहील. एप्रिल महिन्यात एकूण तीन सुट्ट्या आहेत.

• मे महिन्यातील सुट्ट्यांची यादी

मे महिन्यात कोणकोणते सण येतात त्याचबरोबर किती सुट्ट्या आहेत हे माहिती करून घेऊया. मे महिन्यात दोन सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा या निमित्त आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तर त्या दिवशी देखील सुट्टी देण्यात येईल. 1 मे या तारखेला बुधवार येत आहे तर मे महिन्यामध्ये बुधवारची सुट्टी राहील. त्याचबरोबर 23 मे ला बुद्ध पौर्णिमा आहे. 23 मे गुरुवारी येत आहे तर गुरुवारी बुद्ध पौर्णिमा निमित्त सुट्टी राहील. मे महिन्यात दोन सुट्ट्या राहतील.

• जून महिन्यातील सुट्ट्याची यादी
जून महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत ते पाहूया. जून महिन्यात फक्त एकच सुट्टी आहे. जून महिन्यातील सुट्टी ही बकरी ईद निमित्त आहे. 17 जूनला बकरी ईद आहे. त्या दिवशी वार सोमवार येतो तर जून महिन्यात सोमवारी शाळेला सुट्टी देण्यात येईल. जून महिन्यात फक्त एकच सुट्टी आहे ती म्हणजेच बकरी ईद ची.

• जुलै महिन्यातील सुट्ट्यांची यादी

चला तर जाणून घेऊ जुलै महिन्यात किती सुट्ट्या येतात. जुलै महिन्यात देखील एकच सुट्टी येते ती सुट्टी देवयानी आषाढी एकादशी निमित्त असेल. 17 जुलैला देवयानी आषाढी एकादशी आहे. त्या दिवशी वार बुधवार येतो तर जुलै महिन्यात बुधवारची शाळेला सुट्टी राहील.

• ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांची यादी

चला तर बघूया ऑगस्ट महिन्यात किती सुट्ट्या आहेत. ऑगस्ट महिन्यात एकच सुट्टी आहे ती म्हणजेच 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी देण्यात येईल. 15 ऑगस्ट हा वार गुरुवारी येतो ,तर ऑगस्ट महिन्यात गुरूवारची एकच सुट्टी राहील.

• सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी

सप्टेंबर महिन्यात एकूण किती सुट्ट्या आहेत याबद्दल जाणून घेऊया. सप्टेंबर महिन्यात एकूण दोन सुट्ट्या आहेत. म्हणजेच श्री गणेश चतुर्थी आणि दुसरी सुट्टी ईद-ए-मिलादची आहे.7 सप्टेंबरला श्री गणेश चतुर्थी आहे. त्या दिवशी वार शनिवार येतो. तर सप्टेंबर महिन्यात शनिवारची सुट्टी राहील. तसेच 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद आहे त्या दिवशी सोमवार येतो. सोमवारी देखील ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टी देण्यात येईल.

• ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी

ऑक्टोबर महिन्यात सर्व किती सुट्ट्या आहेत माहिती करून घेऊया. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण दोन सुट्ट्या आहेत. पहिली सुट्टी महात्मा गांधी जयंती निमित्त असेल आणि दुसरी सुट्टी दसऱ्यानिमित्त राहील. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आहे त्या दिवशी वार बुधवार येतो. ऑक्टोबर महिन्यात बुधवारी सुट्टी देण्यात येईल. 12 ऑक्टोबरला दसरा आहे आणि त्या दिवशी वार शनिवार येतो तर दसऱ्यानिमित्त ऑक्टोबर महिन्यात शनिवारी सुट्टी देण्यात येईल.

• नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या वारी सुट्टी आहे जाणून घेऊ. नोव्हेंबर महिन्यात एकूण तीन सुट्ट्या देण्यात येतील. लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा आणि गुरुनानक जयंती निमित्त नोव्हेंबर महिन्यात तीन सुट्ट्या राहतील. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. त्यादिवशी शुक्रवार येतो तर नोव्हेंबर महिन्यात शुक्रवारी सुट्टी राहील. तसेच 2 नोव्हेंबरला दीपावली पाडवा आहे आणि त्या दिवशी शनिवार येतो तर नोव्हेंबर महिन्यात शनिवारी देखील सुट्टी राहील. 15 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे वार शुक्रवार येतो. तर त्या दिवशी देखील सुट्टी असेल.

• डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी

Holidays 2024 डिसेंबर महिन्यात कोणत्या सणानिमित्त सुट्टी असेल ते जाणून घेऊया. डिसेंबर महिन्यात एक सुट्टी आहे ती म्हणजेच नाताळ ची. 25 डिसेंबरला नाताळ किंवा ख्रिसमस निमित्त सुट्टी राहील त्या दिवशी वार बुधवार येतो.

वरील लेखात कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या येतात व कोणत्या वारी येतात याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. 2024 या वर्षात एकूण 21 सुट्ट्या आहेत. या 21 सुट्ट्यांमध्ये रविवारच्या सुट्ट्या मोजल्या गेल्या नाहीत. रविवारच्या सुट्ट्या सोडून सर्व 2024 मध्ये 21 सुट्ट्या आहेत जर आपल्याला कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या आहेत बघायचे असेल तर वरी दिलेला पूर्ण लेख वाचावा लागेल. वरील लेख संपूर्ण वाचल्यानंतर कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे लवकरच लक्षात येईल. कोणती सुट्टी कशाबद्दल आहे हे सुद्धा दिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *