Tue. Jun 25th, 2024
How is Karlya's farming?How is Karlya's farming?

How is Karlya’s farming? आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की कारल्याची शेती कशी करावी त्याचबरोबर कारल्याची लागवड कधी व कोणत्या ऋतूमध्ये करावी तसेच कारल्याची लागवड करण्याअगोदर त्या जमिनीमध्ये कोणती तयारी करावी यालाच आपण पूर्व मशागत असे देखील म्हणतो. कारल्याची लागवड करत असताना त्यामध्ये किती अंतर ठेवावे तसेच कारले या पिकाला पाणी कितीप्रमाणात व कसे द्यावे. आणि कारले या पिकाला कीड लागू नये म्हणून या पिकाची काळजी कशी घ्यावी तसेच कारले या पिकाची शेती करून कमी खर्चात जास्त नफा कसा मिळवायचा याबद्दल संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत. आपल्याला जर कारले या पिकाची शेती करायची असेल तर आपण हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा यामध्ये आपल्यासाठी खूप फायदेशीर व महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कारले ची लागवड कशी करावी व कधी करावी यापासून ते फळ येईपर्यंत त्याचबरोबर ते काढण्यापर्यंतची माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

 

कारल्याची लागवड कधी करावी

शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. जर आपल्याला कारल्याची शेती करायची असेल तर कारल्याची लागवड कधी करावी हे आपल्याला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.कधीही कारले लावू शकत नाही, लावायला जमतात परंतु त्यातून आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा नफा मिळत नाही म्हणून कारले लावण्याचाही योग्य कालावधी असतो तो आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. कारले हे उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये लावले जातात जर आपण काढले उन्हाळा किंवा पावसाळ्यामध्ये लावले तर त्यातून आपल्याला भरपूर नफा मिळतो. उन्हाळा म्हणजेच जून जुलै या महिन्यांमध्ये कारल्याची लागवड केल्यास चांगला नफा मिळू शकतो त्याचबरोबर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात जर आपण कारल्याची लागवड केली तरी देखील कारल्याच्या शेतीमधून चांगला नफा मिळतो.

 

हिवाळ्यामध्ये कारल्याची लागवड का करत नाही.

जरी हिवाळ्यामध्ये कारल्याची लागवड केली तरी त्याला पीक येते परंतु जास्त खर्च आणि कमी फायदा असे होते त्यामुळे हिवाळ्यामध्ये कारले या पिकाची लागवड करू नये. जर हिवाळ्यामध्ये कारले या पिकाची लागवड केली तर अति जास्त थंडीमुळे या पिकावर कीड रोग असे वेगवेगळे परिणाम दिसून येतात. जर पिकांवरती हे परिणाम दिसू लागले तर आपल्याला जसा पाहिजे तसा नफा मिळत नाही म्हणून हिवाळ्यामध्ये कारले या पिकाची लागवड करणे टाळावे.

 

कारले हे पीक लावण्या अगोदर जमिनीची कोणाती काळजी घ्यावी

कोणत्याही पिकाची लागवड करायची असल्यास आपण अगोदर जमीन व्यवस्थित करतो म्हणजेच ती नांगरतो मोघडतो त्यातील तण काढतो. या सगळ्या प्रोसेस ला पूर्वमशागत असे देखील म्हणले जाते. कारल्याची लागवड करण्यापूर्वी काय पूर्वमशागत करावी हे इथे पाहणार आहोत. तर कारल्याची लागवड करण्याअगोदर आपण जमिनीतील सर्व तण काढून घ्यावे. जमीन नांगरून घ्यावी व त्यानंतर जमिनीला काही दिवस तापू द्यावे. आपल्या घरी जर शेणखत असेल तर नांगरणीनंतर ते शेणखत आपण त्या जमिनीवर टाकावे म्हणजेच ते शेणखत त्या मातीमध्ये मिक्स करावे. शेणखत मिक्स केल्यामुळे अजूनच कारले हे पीक चांगले येईल.

 

दोन कारल्याच्या पिकामध्ये किती अंतर ठेवावे

कारले हे पिकाचे झाड नसून हे वेल आहे. या कारल्याच्या वेलाला चांगला आधार मिळावा व त्याची वाढ चांगली व्हावी यासाठी त्याची चांगली काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण कारले या पिकाची लागवड पावसाळ्यामध्ये करणार असलो तर या दोन कारल्याच्या वेलामध्ये कमीत कमी दीड ते दोन फूट अंतर असायला पाहिजे. दीड ते दोन फूट अंतर ठेवल्याने कारल्याच्या वेलीला चांगले पसरता येईल. नंतर त्याला चांगले पीक दिसून येईल.

 

कारले या पिकाच्या मध्ये दीड ते दोन फूट अंतर का ठेवावे

कारले हे झाड नसून ते वेळ आहे आणि कोणत्याही वेलेला चांगले वाढण्यासाठी त्याच बरोबर चांगले पीक लागण्यासाठी त्यांना आधाराची गरज असते. तर दीड ते दोन फूट अंतर असल्यामुळे नंतर त्यांना आधार म्हणून त्या अंतरावर काठी किंवा अँगलचा आधार कारल्याच्या वेलेला देऊ शकतो म्हणून कारल्याच्या पिकामध्ये दीड ते दोन फूट अंतर ठेवावे. म्हणजेच कारल्याचे उत्पन्न चांगले होईल त्याचबरोबर त्यांना पीक देखील चांगले लागेल.

 

कारल्याच्या पिकाला कीड लागू नये म्हणून काय काळजी घ्यावी

जर कारल्याची शेती करायची असेल तर आपल्याला त्या पिकाला कीड लागू नये याची काळजी घ्यावी लागेल. तसं पाहिले तर आपण कोणतीही पीक घेत असताना त्या पिकाला कीड किंवा कोणताही रोग होणार नाही याची काळजी घेत असतो परंतु कारले हे पीक क घेत असताना देखील या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. दोन ते तीन वेळा कारल्याच्या पिकांवरती फवारणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यामधील गवत, तण काढणे देखील महत्त्वाचे आहे. कारण गवतावरील रोग हा कारलेच्या वेळी वर जाऊ नये म्हणून ही काळजी घेतली पाहिजे.

 

कारले या पिकाला पाणी किती प्रमाणात व कसे द्यावे.

कारल्याची शेती करत असताना पाण्याचा वापर कसा करावा व कोणत्या पद्धतीने करावा हे इथे पाहणार आहोत. कारले या पिकाला जास्त पाणी दिले तरीदेखील ते पीक खराब होऊ शकते आणि पाणी कमी जरी पडले तरी देखील ते पीक खराब होऊ शकते त्यामुळे या पिकाला पाणी हे प्रमाणात द्यावे. कारल्याच्या पिकाला नियमित पाणी द्यावे लागते परंतु त्या पाण्याचे प्रमाण हे मीडियम असावे लागते. म्हणजेच कारलेला पाणी देत असताना आपण ठिबक सिंचन चा वापर करायला पाहिजे. सरीने मोकळे पाणी देऊ नये त्यामुळे कारले या पिकाला लागलेली फुले गळू शकतात किंवा झाडे पिवळी पडू शकतात. जर पावसाळ्यामध्ये कारल्याची शेती करत असाल तर पाऊस येत नसेल तर आठ ते दहा दिवसाला पाणी देणे गरजेचे आहे. वरी सांगितल्याप्रमाणे जर आपण पाण्याचे व्यवस्थापन किंवा नियोजन केले तर कारले या पिकाला चांगले पीक लागू शकते आणि या पिकातून मोठा फायदा मिळू शकतो.आपण जर या लेखात वरील सांगितल्याप्रमाणे कारले या पिकाची शेती केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. वरी सांगितलेल्या पद्धतीने कारल्याची शेती केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकतो.

 

कारल्याचे दोन प्रकार असतात हिरवे कारले आणि पांढरे कारले तर आपण हिरव्या कारल्याच्या बियाणांची नावे या लेखात पाहणार आहोत.

कारल्याची लागवड करत असताना कोणती बियाणे लावावी

कारल्याची लागवड करत असताना सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की कारले लावायची आहेत परंतु कोणती बियाणे वापरावी हे आज या लेखात आम्ही सांगणार आहोत. कारल्याचे आशा बियाण्यांची नावे जी की तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवून देईल त्याचबरोबर ते टवटवीत व ताजे पीक मिळेल. आपण सगळेजण आपल्या जमिनी नुसार त्याचबरोबर आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या साठ्यानुसार आपण बियाणे निवडत असतो. अशा बियाण्यांची नावे खाली देण्यात येणार आहेत.
• Kaveri – 64
• US agriseeds
• Asmita (syngenta)
हे कारल्याची बियाणे आहेत यापैकी आपण कोणत्याही बियाणांची लागवड करू शकतात किंवा आपल्याला जर माहित असेल कारल्याच्या एखादे बियाणांची नावे तर ते देखील आपण लागवड करू शकतात.

 

चुहा कारले– हे बियाणे जर लावले तर आपल्याला भरपूर नफा मिळू शकतो, त्याचबरोबर या पिकाला बाजारात देखील मोठी मागणी आहे. चुहा कारले हे दिसायला देखील खूप छान दिसतात त्यामुळे त्याची बाजारात मागणी वाढते.चुहा कारल्यामध्ये आपण कावेरी- 64 हे वाण वापरू शकतो या वाणाला सध्या बाजारामध्ये भरपूर अशी मागणी आहे.या कारल्याचा आकार लहान आहे परंतु हे दिसायला हिरव्या रंगाचे त्याचबरोबर काटेरी आहे. दिसायला जरी लहान असले तरी याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

 

US agriseeds हे देखील कारल्याचे एक बियाणे आहे. हे बियाणे लावून देखील चांगला नफा मिळू शकतो. मला देखील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.हे कारले खाण्यासाठी देखील उत्कृष्ट चवीचे आहेत त्याचबरोबर यामध्ये खूप चांगली टिकवून क्षमता आहे.

 

Asmita (syngenta) – हे एक कारल्याचे बियाणे आहे.याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. या बियाणांचे काढले हे वीस ते तीस सेंटीमीटर लांब असतात त्याचबरोबर हे गडद हिरव्या रंगाचे कारले असतात. चवीला उत्कृष्ट असतात आणि आपण जर या बियांची लागवड केली तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो यामध्ये भरपूर प्रमाणात पीक मिळते.

 

वरीलपैकी आपण कोणत्याही बियाणांची लागवड करून चांगल्या प्रमाणात नफा मिळू शकतो. फक्त कारल्याची वरील बियाणे लावले म्हणजेच चांगला नफा किंवा चांगले पीक येते असे नाही तर वरी सांगितलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून जर तशी कारल्याची लागवड करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला चांगला नफा मिळू शकतो त्याचबरोबर आपण कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *